Khandesh Darpan 24x7

लहान वाघोदा येथील जितुसर यांना राज्यस्तरीय समाजसेवक शिक्षक पुरस्कार


प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


लहान वाघोदा येथील सामाजिक कार्यकर्ते व नेहमीच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असणारे तरुण तडफदार व नेहमी जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेला सामान्य कार्यकर्ता तसेच यावल येथील एका व्यास शिक्षण मंडळ या खाजगी संस्थेत कार्यरत असलेले  जितेंद्र चौधरी उर्फ जितुसर यांना जनमत प्रतिष्ठान यांच्या मार्फत समाजसेवक शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार जळगाव येथील सरदार वल्लभभाई लेवा भवन याठिकाणी देण्यात आला.



यावेळी जळगावच्या महापौर सौ. जयश्री महाजन, माजी महापौर सौ. सिमा भोळे, नगरसेविका अध्यक्ष मुक्ताई महिला बहु. संस्था सौ. निता  सोनवणे, प्रोजेक्ट ऑफिसर जिल्हा उद्योग केंद्र नाशिक आनंद विद्याघर,  जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, चेअरमन शेंदुर्णी एज्यु.सो. संजय गरुड, पाचोरा येथील स्पीकर सचिन देवरे सर, मुख्याध्यापिका श्री स्वामी समर्थ विद्यालय कुसुम्बा सौ. प्रतीक्षा पाटील,  अध्यक्ष ईकरा शिक्षण संस्था डॉ. करीम सालार, जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज नाले यांच्या उपस्थित सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.



जितुसर यांना राज्यस्तरीय समाजसेवक शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल व्यास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, सचिव उल्हास चौधरी, सहसचिव रविंद्र पाटील, उपाध्यक्ष लीलाधर चौधरी, अतुल चौधरी, संचालक धनंजय फिरके सर, ए. बी. महाजन, नितीन महाजन, प्राचार्य गिरीश वाघुळदे व सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

Previous Post Next Post