Khandesh Darpan 24x7

विद्यापीठाच्या गुणांकन यादीत फैजपूर चे धनाजी नाना महाविद्यालय ला अव्वल स्थान





कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गांचे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले त्यात विद्यापीठाच्या गुणांकन यादीत धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.





यात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम रसायशास्त्र विषयात ऋतुजा गोपाळ पाटील-प्रथम क्रमांक, योगिता किशोर राणे- द्वितीय क्रमांक व जयश्री घनश्याम महाजन- तृतीय क्रमांक पटकावला.


तसेच पदवी स्तरावार विज्ञान शाखेतून गणित विषयात गीताली बाळ होले या विद्यार्थिनीने विद्यापीठ स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.



सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, रसायनशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डी.बी. तायडे, गणित विषयाचे विभागप्रमुख डॉ. हरीश नेमाडे, दोन्ही विभागातील सर्व प्राध्यापक आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

Previous Post Next Post