Khandesh Darpan 24x7

दि.९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान फैजपूर येथे झालेल्या युवक महोत्सवाचा समारोप जल्लोषात

 



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी  


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळाचे धनाजी नाना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. 




दि.९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान फैजपूर येथे झालेल्या युवक महोत्सवाचा समारोप सोमवारी प्रसिध्द अभिनेते गौरव मोरे यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाला. 



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, व्य. प. सदस्य तथा युवारंगचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे हजर होते. 




याशिवाय स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. सुधाकर चौधरी, अधिसभा सदस्य प्राचार्य सुनील पवार,  प्रा. एकनाथ नेहेते, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. पदमाकर पाटील, प्रा. संदीप नेरकर, अमोल मराठे, नेहा जोशी, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संस्थेचे पदाधिकारी लिलाधर चौधरी, प्रा.नंदकुमार भंगाळे, प्रा.एस.एस.पाटील, किशोर चौधरी, मुरलीधर फिरके, प्रा. डी. ए. नारखेडे, मिलींद वाघुळदे, संजय चौधरी, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, प्राचार्य आर. एल. चौधरी, डॉ. अजित थोरबोले, धनंजय चौधरी, समन्वयक प्रा. शंकर जाधव, सहसमन्वयक प्रा. राकेश तळेले यांची उपस्थिती होती. 




यावेळी बोलतांना ......

गौरव मोरे यांनी “मना देश जय जय खान्देश ”  या वाक्याने सुरुवात केली.  सादरीकरणाच्या वेळी पडलेल्या टाळया म्हणजे पारितोषिक असते.  पारितोषिक मिळाले नाही तरी शेवटपर्यत प्रयत्न करा. यश मिळेल. असा सल्ला देत आम्ही देखील अशाच व्यासपीठावर कला सादर करुन पुढे आलो आहोत.  मात्र मेहनत आणि परिश्रमाची तयारी ठेवा असे ते म्हणाले. 




डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, इतर कलावंतांकडून प्रेरणा घेतली तर यश नक्की मिळेल. पुढील युवारंगची जबाबदारी विद्यापीठाने आमच्या संस्थेकडे दिल्यास चांगले आयोजन करु असे ते म्हणाले.  


प्रदीप पवार यांनी आपल्या मनोगतात चारित्र्य संवर्धन जपणे महत्त्वाचे असते असा सल्ला देत अशा महोत्सवातून खान्देशातील तरुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 


कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे म्हणाले की, या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि जोश पाहून नियेाजन करण्यात आनंद प्राप्त झाला, विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविण्यात विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली. 




अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू प्रा.एस. टी. इंगळे यांनी केवळ कलावंत म्हणून मोठे न होता त्यासोबत माणूस म्हणून देखील मोठे व्हा.  यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. आपल्यातील उणीवा शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले. 


प्रा.सुधाकर चौधरी यांनी मोठयांचा आदर करणे ही आपली संस्कृती असून तीचा विसर पडू देऊ नका यश तूमच्या मागे येईल असे मत व्यक्त केले.  


धनंजय चौधरी यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी असतात तसेच आठवणी जपण्यसाठी देखील असतात.  त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत सहभाग महत्त्वाचा असतो असे मनोगत व्यक्त केले. 



प्रारंभी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सिलबंद पाकीटातून प्र-कुलगुरुंकडे निकाल सुपूर्द केला.  यावेळी सहभागी विद्यार्थ्यांकडून अमोल पाटील, संघ व्यवस्थापकांपैकी प्रा.हरेश चौधरी, प्रा. विजय पालवे, डॉ. नंदा वसावे यांनी मनोगत व्यक्त केले.  


प्राचार्य पी. आर. चौधरी, प्रा. एस.व्ही.जाधव, प्रा. राकेश तळेले, शेखर महाजन,  तुषार फिरके यांचा सन्मान करण्यात आला. 


सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र राजपूत व डॉ.राजश्री नेमाडे यांनी केले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी आभार मानले. 


युवारंग स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-


1) संगीत विभाग






शास्त्रीय वादन (तालवाद्य) :- 


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव .

तृतीय -- महात्मा गांधी शि.मं.चे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा.


शास्त्रीय वादन (स्वरवाद्य):-


प्रथम    --  महात्मा गांधी शि.मं.चे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

तृतीय -- आय. एम. आर., जळगाव.


   गायन 


शास्त्रीय गायन :-

प्रथम    --  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- पु. ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ.
 

तृतीय -- महात्मा गांधी शि.मं.चे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा.


सुगम गायन (भारतीय) :-


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- पु. ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ.

तृतीय -- प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

पाश्चिमात्य गायन :- 


प्रथम    --  प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

द्वितीय -- महात्मा गांधी शि. मं.  कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, चोपडा.

तृतीय -- जी. एच. रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंट, जळगाव.

समुह गायन (भारतीय):-


प्रथम    --  प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

द्वितीय -- मु. जे.महाविद्यालय, जळगाव.

तृतीय -- महात्मा गांधी शि. मं. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, चोपडा.

समुह गायन (पाश्चिमात्य):- 


प्रथम    --  महात्मा गांधी शि. मं. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, चोपडा.

द्वितीय -- मु. जे.महाविद्यालय, जळगाव.

तृतीय -- प्रताप महाविद्यालय, अमळनेर.


    संगीत 

नाट्य संगीत :-  


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- पु. ओ. नाहाटा महाविद्यालय, भुसावळ.

तृतीय -- क. ब. चौ. उमवि शैक्षणिक प्र. शाळा, जळगाव.


लोकसंगीत (वाद्यवृंद):-


प्रथम    --  महात्मा गांधी शि. मं. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, चोपडा.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

तृतीय -- प्रताप महाविद्यालय, अमळनेर.


पाश्चिमात्य वाद्यसंगीत:-


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- जी. एच. रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंट, जळगाव.

तृतीय -- पी.एस.जी.व्ही.पी.एस. महाविद्यालय, शहादा.



2) नृत्य विभाग











समुह लोकनृत्य:-  


प्रथम    --  प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

तृतीय -- महात्मा गांधी शि. मं. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, चोपडा.



शास्त्रीय नृत्य:- 


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- जी. एस. रायसोनी इन्स्टीटयुट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंट, जळगाव.

तृतीय -- नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव.



३) साहित्य कला 





वक्तृत्व:- 


प्रथम    --  विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे.

द्वितीय -- प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

तृतीय -- श्रमसाधना बॉम्बे ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बांभोरी.


वादविवाद:- 


प्रथम    --  विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे.

द्वितीय -- प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

तृतीय -- डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय, जळगाव.




४) नाट्य कला








विडंबन नाट्य:- 

प्रथम    --  प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

द्वितीय -- एस. एस. व्ही. पी. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे.

तृतीय -- पू. सा.गु.वि.प्र.मंडळाचे फार्मसी महाविद्यालय, शहादा.


मुक नाट्य:-  


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

तृतीय -- पू. सा.गु.वि.प्र.मंडळाचे फार्मसी महाविद्यालय, शहादा.

 मिमिक्री:- 


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- महात्मा गांधी शि. मं. कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, चोपडा.

तृतीय -- पू. सा.गु.वि.प्र.मंडळाचे फार्मसी महाविद्यालय, शहादा.



५) ललित कला







रांगोळी:- 


प्रथम    --  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर.

तृतीय -- कला, वाणिज्य, विज्ञान  महाविद्यालय,  कुऱ्हा कोकोडा.



व्यंगचित्र:-


प्रथम    --  शिरीष चौधरी महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- महात्मा गांधी शि. मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा.

तृतीय -- मु. जे. महाविद्यालय, जळगाव.


कोलाज:- 


प्रथम    --  महात्मा गांधी शि. मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

तृतीय -- डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव.


क्ले मॉडेलिंग:-


प्रथम    --  धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर.

द्वितीय -- महात्मा गांधी शि.मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा.

तृतीय -- मु. जे. महाविद्यालय, जळगाव.


स्पॉट पेंटिग:- 


प्रथम    --  बी. पी. आर्टस, एस.एम.ए. सायन्स, के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव .

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

तृतीय -- संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर.


पोस्टर मेकींग:-


प्रथम    --  के. सी. ई. शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- मु. जे. महाविद्यालय, जळगाव.

तृतीय -- बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स, के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव.


इन्स्टॉलेशन:- 


प्रथम    --  सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर.

द्वितीय -- प्रताप महाविद्यालय, अमळनेर.

तृतीय -- बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स, के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव.


फोटोग्राफी:-


प्रथम    --  महात्मा गांधी शि. मं. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा.

द्वितीय -- के. सी. ई. शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव.

तृतीय -- शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव.


मेहंदी:-


प्रथम    --  शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव.

द्वितीय -- श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोरा.

तृतीय -- काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार.


पोस्टर प्रदर्शन :-


प्रथम    --  धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर.

द्वितीय -- शहादा तालुका केा-ऑप एज्य. सोसा.चे विज्ञान महाविद्यालय, शहादा .

तृतीय -- मु. जे. महाविद्यालय, जळगाव .



गट निहाय विजेतेपद 


१. संगीत गट : मु.जे.महाविद्यालय,जळगाव.


२. नृत्य गट : मु. जे. महाविद्यालय, जळगाव.


३. साहित्य कला गट :  विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे.


४. नाट्य गट : मु. जे. महाविद्यालय, जळगाव आणि प्रताप महाविद्यालय, अमळनेर.


५. ललित कला गट : मु. जे. महाविद्यालय, जळगाव.      




जिल्हानिहाय प्रोत्साहनपर फिरतेचषक

 

जळगाव जिल्हा (डॉ.अरविंद चौधरी पुरस्कृत स्व.वसुंधरा चौधरी चषक ) : 


महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, चोपडा.

 

धुळे जिल्हा (प्रा.मुक्ता महाजन पुरस्कृत स्व.शांताबाई महाजन चषक ) :    

 

विद्यावर्धिनी  महाविद्यालय, धुळे.

 

नंदुरबार जिल्हा (प्रा.सुनील कुलकर्णी पुरस्कृत स्व.बाबुराव कुलकर्णी देशगव्हाणकर चषक) :


पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा.



सर्वसाधारण विजेतेपद  

 

विजेता       :  मु. जे. महाविद्यालय, जळगाव.  (डॉ. जी.डी.बेंडाळे स्मृती चषक) 

 



उपविजेता  :  प्रताप महाविद्यालय, अमळनेर.  (कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी स्मृती चषक)  






अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

Previous Post Next Post