चिनावल येथील “दाम्पत्य बेपत्ता ! परिसरात हळहळ”
कर्जबाजारीपणा, मानसिक तणाव की कौटुंबिक चिंता? विविध कारणांची गावांत चर्चा; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र...!
सावदा येथील जवळच असलेल्या चिनावल येथील दाम्पत्य अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीयांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिल महारु नेमाडे (वय ५७) व भारती अनिल नेमाडे (वय ४६) हे दाम्पत्य १६ मे रोजी सकाळी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले असून त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही.
या प्रकरणी सावदा पोलिस स्टेशनमध्ये हरवीलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सत्र सुरू करण्यात आले आहे. मुलगा टेकचंद नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील अचानक घर सोडून गेल्याने संपूर्ण कुटुंब हादरले आहे.
| जाहीरात |
नातेवाईक, मित्रपरिवार व विविध ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, या घटनेमागे नेमके कारण काय असावे याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. आर्थिक अडचण, कर्जाचा वाढता ताण, मानसिक तणाव, कौटुंबिक चिंता किंवा इतर काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी घर सोडले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृतरीत्या कोणतेही ठोस कारण समोर आलेले नसून पोलिस सर्व शक्यता तपासत आहेत.
अनिल नेमाडे यांचे वर्णन रंग निमगोरा, उंच बांधा, चेहरा लांब, उंची अंदाजे ५.५ फुट, समोर टक्कल, उजवा हात अपघातामुळे थोडा कोपरा पासून कायमचा वाकलेला. तर भारती नेमाडे या शरीराने स्थूल चेहरा गोल, उंची अंदाजे ५ फुट ३ इंच असून केस काळे-पांढरे आणि लांब, गळ्यात मंगळसूत्र, नाक कान टोचलेले अशी ओळख सांगण्यात आली आहे.
सावदा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित दाम्पत्य कुठेही दिसल्यास तात्काळ सावदा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून “आई-वडील सुखरूप लवकर परत यावेत” अशी भावनिक प्रतिक्रिया मुला कडून तथा नागरिकांतून उमटत आहे.
कोणाला काही माहिती असल्यास सावदा पोलीस ठाणेत संपर्क साधावा पुढील तपास स पो नि विशाल पाटील यांचे मार्गदर्शन खाली विनोद पाटील, रवींद्र महाजन करीत आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क : सावदा पोलीस स्टेशन ०२२५८४ २२२०४३
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |











Post a Comment