प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
स्वा.वि.गा.ई. कृषी महाविद्यालयाच्या साकळा शाखेतील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ९ जून २०२६ रोजी तरोडा बु. येथे माती परीक्षण उपक्रम राबविला. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत माती परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच शेतजमिनीतील मातीचे नमुने संकलित केले.
माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक घटकांची उपलब्धता, कमतरता व मातीचा दर्जा समजण्यास मदत होते. त्यानुसार शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन व पीक नियोजनासाठी योग्य मार्गदर्शन मिळू शकते. या उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना सहकार्य केले.
यावेळी गावाच्या सरपंच फुलावती पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. माती परीक्षण उपक्रमात संकेत महाले, कार्तिक ताथोड, आदित्य जळमकार, पृथ्वीभूषण मामनकार, श्रद्धा नेमाडे, हर्षल खाडे, राहुल चौधरी, विशाल देशमुख, वेदांत कोलते, प्रतीक चंदनसेन आणि मासिर शेख या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्रा. योगेश गावई, कार्यक्रम अधिकारी अविनाश आहोळे तसेच समन्वयक प्रमोद बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |











Post a Comment