मा. माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे हे वयाची ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या औचित्याने, दि. २६ ऑगस्ट २०२६ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत 'अमृत महोत्सव सप्ताह' आयोजित करण्याचे ठरलेले आहे.
या अमृत महोत्सव सप्ताहानिमित्त दि. ३० ऑगस्ट २०२६ रविवारी सकाळी ११ वाजता अमृत महोत्सवी सोहळा संत मुक्ताई मंदिर, कोथळी येथे संपन्न होणार आहे. या सर्वपक्षीय अमृत सोहळा कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी केले आहे.
या अमृत सोहळ्याच्या नियोजना संदर्भात मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊस येथे नियोजनाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अमृत महोत्सव समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली, तसेच विविध प्रकारच्या ज्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती दिली.
या अमृत महोत्सव सोहळ्याला सर्वपक्षीय केंद्रीय व राज्यस्तरावरील नेते उपस्थित राहणार आहेत, तसेच दि. २६ ऑगस्ट, २०२६ ते दि. २ सप्टेंबर, २०२६ या कालावधीत 'भागवत सप्ताहा' चे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे, अशी माहिती प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी यावेळी दिली.
या बैठकीला माजी सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती अनिल वराडे, माजी सभापती विलास धायडे, माजी सभापती दशरथ कांडेलकर, माजी सभापती राजेंद्र माळी, माजी जि. प. सदस्य कैलास चौधरी, माजी जि.प. सदस्य रामदास पाटील, माजी सभापती गणेश पाटील, माजी सभापती विकास पाटील, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संपूर्ण संचालक मंडळ, सरपंच डॉ. बी.सी. महाजन, ईश्वर रहाणे, सरपंच नारायण चौधरी, प्रभाकर झोपे, माजी जि.प. सदस्य निलेश पाटील, रामभाऊ पाटील, प्रशांत (आबा) पाटील, किशोर महाजन, वसंत पंढरीनाथ पाटील, भागवत पाटील, अतुल पाटील, विकास पाटील, पराग पाटील, अजय भारंबे, ज्ञानेश्वर पाटील, किशोर गायकवाड, नंदकिशोर हिरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Post a Comment