प्रतिनिधी | जळगाव
येथील लाड वंजारी मंगल कार्यालय, आकाशवाणी चौक येथे दिव्यांग व वृद्धांसाठी आयोजित तीन दिवसीय मोफत साहित्य वाटप शिबिर उत्साहात पार पडले. आचार्य श्री. हिराचंद्रजी म.सा., भावी आचार्य परम श्रद्धेय महेंद्रचंद्रजी म.सा. व प्रमोद मुनी यांच्या प्रेरणेने आणि श्रीमती सुदादेवी हिरावत व कै. टिकमचंदजी हिरावत यांच्या स्मृतीनिमित्त 'श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर' यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
दिनांक ५ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात ९४० दिव्यांग आणि वृद्ध लाभार्थ्यांना कृत्रिम पाय (जयपूर फूट), पांढरी काठी, कॉलीपर, कृत्रिम हात, तीन चाकी सायकली, व्हीलचेअर, वॉकर, कुबड्या आणि कानाचे मशीन यांसारखी आवश्यक साधने मोफत वाटप करण्यात आली.
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार विजेते तथा जयपूर समितीचे चेअरमन डी. आर. मेहता, माजी आमदार मनीष जैन, उद्योगपती नीता डागा, राजीव डागा, सुशील बाफना, महावीर बोथरा, अनिल बोथरा, सुनील बाफना, तारादेवी बाफना, सुदादेवी केशवस्मृती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष भरत अमळगावकर आणि माजी उपमहापौर करीम सालार यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी डी. आर. मेहता आणि माजी आमदार मनीष जैन यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, जैन रत्न हितैषी श्रावक संघ, युवक परिषद आणि शिबिर समितीचे प्रमुख राजेश सांखला, विमल संघवी व राजेंद्र कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.










Post a Comment