Khandesh Darpan 24x7

सावदा पालिकेला अत्याधुनिक व्हॅक्यूम वाहन प्राप्त ; नागरिकांचे आरोग्य सुधारणार!



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


महाराष्ट्र शासनाच्या 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान' अंतर्गत सावदा पालिकेस अत्याधुनिक व्हॅक्यूम एम्प्टियर (मैला व सांडपाणी उपसा) वाहन प्राप्त झाले आहे. शहराची लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्या हस्ते या वाहनाचा पालिका परिसरात लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी सत्ताधारी गटाच्या न.पा.आरोग्य सभापती प्रतीक्षा भंगाळे सह गटनेते तथा नगरसेवक आणि न.पा. कर्मचारी उपस्थित होते. 


या ३ हजार क्षमतेच्या आधुनिक वाहनामुळे सावदा शहर अधिक स्वच्छ आणि रोगराईमुक्त होण्यास मदत होणार आहे. सदर वाहन देण्यामागील शासनाचा मुख्य हेतू असा की, मानवी प्रतिष्ठेचे रक्षण व्हावे जेणे करुन स्वच्छता कर्मचाऱ्यांना मानवी विष्ठा, दूषित कचरा हाताने साफ करावा लागू नये, या अनिष्ट प्रथेचे पूर्ण उच्चाटन करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. 

पर्यावरण व भूजल रक्षण म्हणजे सेप्टिक टँक ओव्हरफ्लो होऊन त्याचे दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी जमिनीत व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मुरू नये यासाठी ही यंत्रणा दिली आहे. तसेच सावदा सारख्या छोट्या पालिकांचे सक्षमीकरण व्हावे व तांत्रिकदृष्ट्या पालिका सक्षम करून येथील करदाते नागरिकांना सुद्धा मोठ्या शहरांप्रमाणे आधुनिक सुविधा पुरवणे हा यामागील शासनाचा मुख्य हेतू आहे.

तरी मैला व सांडपाणी थेट सदरच्या बंदिस्त वाहनातून उपसले जाणार असल्याने शहरात दुर्गंदी पसरणार नाही, तुंबलेल्या गटारी, ड्रेनेज लाईन्स आणि सेप्टिक टँक कमी वेळेत पूर्णपणे साफ करता येतील. कमी खर्चात नागरिकांना खाजगी कंत्राटदारांऐवजी आता पालिकेकडून अत्यंत रास्त दरात ही सेवा उपलब्ध होईल. पावसाळ्यात किंवा ड्रेनेज चोकअप झाल्यास पालिकेला तात्काळ पाण्याचा उपसा करून परिस्थिती नियंत्रणात आणणे सोपे होईल. अशा आपत्कालीन स्थितीत सदरील आधुनिक वाहनाची मदत घेता येईल.


चौफेर चर्चा  : कोट्यवधींचा खर्च,पण सावद्यात स्वच्छता फक्त कागदावरच?



सावदा येथील घनकचरा प्रकल्प अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून संपूर्ण प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा आणि कचराच भरलेला दिसून येते. म्हणूनच या घनकचरा प्रकल्पाच्या मुख्य गेट समोर व शेत रस्त्यावर ओल्या-सुक्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर कचरा साचल्याने शेतात जाणाऱ्या आणि या प्रकल्पाच्या अवतीभवतीच्या शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून याचा प्रचंड मनस्ताप व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

मार्च २०२५ मध्येच या घनकचरा ठेकेची मुदत संपली असतानाही नवीन ठेका न देता जुन्याच ठेकेदाराला बेकायदेशीरपणे पालिकेकडून मुदतवाढ देण्यात आली. तरी याचे गंभीर परिणाम थेट पालिकेच्या फंडावर पडत आहे. तरी कचऱ्याचा नविन ठेका देण्यासाठी दि.२२ जुलै २०२६ रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाला निविदाही काढण्यात आली. मात्र, मर्जीतील ठेकेदाराकडेच हा ठेका जावा म्हणून यासाठी मोठा राजकीय दबाव आल्याने हा ठेका वादाच्या भोवऱ्यात आल्याने थेट औरंगाबाद उच्च न्यायालयात पोहोचला असून सध्या न्यायप्रविष्ट आहे. 

तरी एकीकडे शासन जनतेच्या आरोग्यासाठी वारेमाप पैसा खर्च करून आधुनिक वाहने आणि निधी देत आहे, तर दुसरीकडे अंतर्गत राजकारणामुळे शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य वाढत असल्याची चर्चा होत आहे. तरी सावदा शहराच्या या दुर्दशेला आणि अस्वच्छतेला नेमके जबाबदार कोण? असा संतप्त सवाल करदात्या शहरवासीयांकडून विचारला जात आहे. तरी याकडे जिल्हाधिकारी रोहन घुगे जळगाव यांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

जाहीरात



सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



             सौजन्य: दै. लोकमत   व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post