सावदा पालिका सर्वसाधारण सभेत २७ विषयांना मंजुरी; मागासवर्गीय समाजाच्या मुद्द्यावरून व नाल्याचा प्रवाह थांबवून लेआउट एनए प्रकरणावरून वादळी चर्चा
सावदा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष रेणुका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपनगराध्यक्ष फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण, मुख्याधिकारी भूषण वर्मा तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेत एकूण २७ विषयांवर चर्चा करून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने ![]()
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शहरातील दिव्यांग बांधवांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील दिव्यांग अनुदान वितरित करण्याबाबतचा विषय मंजूर करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांच्या जन्मनियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कचऱ्याचे संकलन, वाहतूक व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत चर्चा झाली. तसेच शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई, स्वामीनारायण नगर परिसरातील शिव-हनुमान मंदिराजवळ लग्न समारंभात वाजणाऱ्या बँड व डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवणे, नगरपरिषद क्षेत्रात नवीन उद्यान विकसित करणे, स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी उभारणे आदी विषयांनाही सभेत मंजुरी देण्यात आली.
तसेच शहरातील नवीन गटारी बांधकाम, जुन्या गटारींची दुरुस्ती, झाकण बसविणे, विविध इमारतींच्या किरकोळ दुरुस्ती कामांसाठी वार्षिक निविदा काढणे, नगरपरिषद संचलित उर्दू माध्यम शाळेसाठी शौचालय व पाण्याच्या टाकीचे बांधकाम, तसेच विविध भागात संरक्षण भिंती व इतर पायाभूत सुविधांची कामे करण्यासही मान्यता देण्यात आली.
दरम्यान सभेदरम्यान मागासवर्गीय समाजाशी संबंधित एकही विषय इतिवृत्तात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी आक्षेप नोंदविला. यावेळी नगरसेवक विशाल तायडे तसेच त्यांच्या सहकारी नगरसेवकांनीही नगराध्यक्षांना जाब विचारला. या मुद्द्यावरून काही काळ सभागृहात खडाजंगी झाली.
याचवेळी शहराच्या हद्दीत नाल्याचा नैसर्गिक प्रवाह थांबवून बनावट मोजणी शीट दाखवत एका लेआउटला एन.ए. (नॉन-अग्रीकल्चरल-बिन शेती) मंजुरी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही सभेत करण्यात आला. या प्रकरणावरून सभागृहात वादळी चर्चा रंगली. विशेष म्हणजे या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित करताच सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनीही त्यांना साथ दिल्याने वातावरण अधिक तापले.
सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी झालेल्या कराराअंतर्गत सावदा शहरातून काँक्रिटीकरण केलेल्या स्वर्गीय हरिभाऊ जावळे महामार्गाच्या बाजूला केलेल्या गटारीची वेळोवेळी साफसफाई तसेच त्या रस्त्यावर गतिरोधक ची मागणी असतानाही गतिरोधक नसल्याने सातत्याने होणारे छोटे-मोठे अपघात त्याचप्रमाणे पथदिवे नसल्याने नागरिकांची होणारी गैरसोय साठी त्वरित न. पा. ने सावर्जनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्यांचे निराकरण करण्याची मागणी झाली.
सभेत गटनेत्या रंजना भारंबे यांनी मांडलेल्या खिरोदा रोड ला लागून असलेले स्व. प्रभाकर बुला महाजन बहुउद्देशीय सभागृह समोरील न. पा. मालकीची जी जागा आहे तिच्या बाजूला असलेल्या छोट्या टपऱ्या हलवून त्या जागेला संपूर्ण चारही बाजूला बंदिस्त असे कंपाउंड करणे जेणे करून पालिकेच्या मालमत्तेचे रक्षण आपल्या परीने होईल.
तसेच मस्कावद रोडला असलेल्या शेकडो वर्षाची मरी माता आईच्या हनुमान जयंतीच्या दिवशी या यात्रोत्सवाची परंपरा आहे या दिवशी बारागाडे ओढले जातात, मंदिरापासून ते बारागाडे ओढले जाणाऱ्या मार्गावर अतिक्रमण चे साम्राज्य झाले आहे. बारागाडे पाहणार्या भाविकांना त्या ठिकाणी उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नाही. भाविक दाटीवाटीने उभे राहतात अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ शकतो हे रोखणे सर्वस्वी आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्या ठिकाणी असलेल्या लाकडाचे ओंडके, विटांची तुकडे, काड्यांचे ढीग या सर्वांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने ही परंपरा बंद होण्याच्या मार्गावर आहे असे दिसते म्हणून येथील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवणे गरजेचे आहे. यामुद्याला अनुमोदन तथा हिरवा कंदील दिला. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण च्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन महिलांना स्वावलंबी बनवण्याकामी जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करण्यासाठी चा प्रस्ताव पारित करण्यात आला.
यावेळी राजेश वानखेडे यांनी नगरसेवक प्रश्न विचारत असताना त्यांना पूर्ण बोलू द्यावे, मध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये तसेच कोणत्याही नगरसेवकाकडे बोट दाखवून बोलू नये, असे स्पष्टपणे सभागृहात निदर्शनास आणून दिले. या चर्चेदरम्यान कामांमधील टक्केवारीचा मुद्दाही सभेत चांगलाच गाजला. तथापि, चर्चेनंतर सभेतील सर्व २७ विषयांना अखेरीस मंजुरी देण्यात आली आणि शहरातील विविध विकासकामांना हिरवा कंदील मिळाला. चर्चेमध्ये विषय मंजुरीसाठी सर्व नगरसेवक सहभागी झाले.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |



















إرسال تعليق