Khandesh Darpan 24x7

सावद्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुतळ्याचे पूजन; पुतळा उभारणीला प्राधान्य–भरत नेहते




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावदा शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुभाष चौक, मोठा आड परिसरात तर शिवसेना (शिंदे गट) यांनी माळी वाडा भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून साजरी केली. 




मोठा आड परिसरात स्वामिनारायण मंदिराचे पुजारी स्वामी सत्यप्रकाशदासजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. 



हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने 




या वेळी माजी नगरसेवक धनंजय चौधरी, माजी नगरसेवक चंद्रशेखर पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक सचिन बऱ्हाटे, पंकज येवले, नकुल बेंडाळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख निलिमा भारंबे, नगरसेविका विजया जावळे, जयश्री नेहते, प्रतीक्षा भंगाळे, सुनिता तायडे, रंजना भारंबे, जे.के. भारंबे, मनीष भंगाळे, मिलिंद पाटील, शरद भारंबे, अतुल नेहते, प्रमोद भंगाळे, मोहन भंगाळे, वामन भारंबे, शांताराम भंगाळे, राहुल चौधरी, गणेश माळी यांच्यासह परिसरातील शिवप्रेमी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 



यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहरप्रमुख भरत नेहते यांनी सांगितले की, "मागील दोन वर्षांपासून फैजपूर रोडवरील शासकीय विश्राम गृहाजवळील वाय पॉईंट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वावर विराजमान असा भव्य पुतळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून त्या संदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सध्या सुरू आहे. पुतळा उभारणीला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने गेल्या दोन वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढणे जाणीवपूर्वक रद्द करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांच्या आर्थिक सहकार्यातून विनाकारण मिरवणुकीवर खर्च करण्यापेक्षा त्या निधीचा उपयोग पुतळा उभारणीसाठी व्हावा, अशी आमच्या शिवसेनेची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले." 




या पुतळ्यासाठी लागणारी शासकीय विश्राम गृहाजवळिल जागा दानशूर व्यक्तिमत्व कै. विष्णू हरी पाटील यांच्या कुटुंबियांनी सामाजिक भावनेतून मोफत उपलब्ध करून दिली असून त्या ठिकाणी लवकरात लवकर पुतळा उभारणीचे प्रक्रिया होणार असल्याची माहिती भरत नेहते यांनी दिली. 



शहरातील माळी वाडा भागात सावदा नगरपरिषदेत निवडून आलेल्या सर्व शिंदे गटाच्या प्रतिनिधींनी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करत अभिवादन केले. प्रसंगी सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी विशाल पाटील त्याच प्रमाणे उबाठा गटाचे काही कार्यकर्ते सुध्दा उपस्थित होते.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   






व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post