Khandesh Darpan 24x7

सावदा गट नं. १३५ मधील नैसर्गिक जलप्रवाह बंद : नागरिकांच्या जीविताला धोका

सावदा गट नं. १३५ मधील नैसर्गिक जलप्रवाह बंद; नागरिकांच्या जीविताला धोका, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष




प्रतिनिधी :  सावदा 



सावदा येथील गट नं. १३५ मधील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बेकायदेशीररित्या बंद करून करण्यात आलेल्या अनधिकृत प्लॉटिंगमुळे या परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही समस्या गंभीर रूप धारण करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


प्राप्त माहितीनुसार, गट नं. १३५ मधील प्लॉट नं. १ ते ३ आणि प्लॉट नं. १५ ते २० या परिसरातील नैसर्गिक पाण्याचा मार्ग माती तथा मुरूम भरून तसेच अन्य प्रकारे अनधिकृतपणे अडवण्यात आला आहे. या जलप्रवाहावरच प्लॉटिंग करण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाण्यास जागा उरलेली नाही. परिणामी, भविष्यात पावसाळ्यात या भागात पाणी तुंबून गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याचा आणि नागरिकांच्या मालमत्तेचे व जीविताचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.


जाहीरात




स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रकाराबाबत सावदा नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून या तक्रारींची दखल घेऊन अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष व्यक्त केला जात आहे.


या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधून नागरिकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत: त्यात सदर भागात सुरू असलेल्या अनधिकृत प्लॉटिंग आणि माती भरावाच्या कामाला त्वरित स्थगिती देण्यात यावी, अडवण्यात आलेला नैसर्गिक जलप्रवाह तात्काळ पूर्ववत करावा, नैसर्गिक जलप्रवाह अडवणाऱ्या संबंधित विकासकावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर विभागीय कारवाई करावी.


पावसाळा जवळ आला असताना ही समस्या तातडीने न सोडवल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



               


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post