Khandesh Darpan 24x7

गिरीश महाजनांच्या बदनामीचा प्रयत्न ; सावदा भाजप आक्रमक, संबंधितांवर कारवाईची मागणी


प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



राज्यातील ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे मॉर्फ केलेले फोटो आणि दिशाभूल करणारा मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन रावेर तालुका भाजप (सावदा मंडळ) अध्यक्ष दुर्गादास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावदा पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

जाहीरात

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवली जात आहे. काही अज्ञात व्यक्तींनी मंत्र्यांचे फोटो मॉर्फ करून, त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून तो व्हायरल केला आहे. हा प्रकार केवळ राजकीय टीका नसून, मंत्र्यांची सार्वजनिक प्रतिमा मलीन करणे आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात बोलताना तालुकाध्यक्ष दुर्गादास पाटील म्हणाले, "सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणाच्याही वैयक्तिक किंवा राजकीय प्रतिमेवर घाला घालणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा, भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

सावदा पोलिसांनी हे निवेदन स्वीकारले असून, सायबर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट्सचा तांत्रिक तपास केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

या निवेदनावर रावेर तालुकाध्यक्ष दुर्गेश प्रभाकर पाटील, सरचिटणीस विनायक दुर्योधन कोळी आणि महेश प्रभाकर अकोले, जिल्हा अध्यक्षा रेखाताई रोहिदास बोंडे, कोषाध्यक्ष जितेंद्र सुरेश चौधरी, गटनेत्या रंजना जितेंद्र भारंबे, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम प्रकाश पाटील यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   





व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

أحدث أقدم