महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई (सावदा शाखा) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा सावदा येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली. तालुका अध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पत्रकारांच्या हिताच्या व कल्याणाच्या विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पत्रकारांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना कार्यक्षमतेसाठी बळ देणे, या उद्देशाने बैठकीत खालील निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले, तसेच २०२६-२७ या वर्षासाठीच्या अधिकृत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे पत्रकारांना व्यावसायिक कामात अधिक सुलभता येईल. यासोबतच पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला. पत्रकारांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता, संघटनेच्या सर्व सभासदांचा 'एलआयसी' (LIC) विमा उतरवण्याचा ऐतिहासिक निर्णय सुद्धा घेण्यात आला.
| जाहीरात |
बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल म्हणाले की, "पत्रकार समाज हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे आणि त्यांना सुरक्षित कार्यवातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे. भविष्यातही अशाच प्रकारे विविध उपक्रम राबवून पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना कटिबद्ध राहील."
याप्रसंगी खान्देश विभागीय कार्याध्यक्ष संतोष नवले, जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोंडे, कार्याध्यक्ष दिपक श्रावगे, जिल्हा ग्रामीण सचिव राजेश चौधरी (राज सर), तालुकाध्यक्ष रवींद्र महाजन, सावदा शहराध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, सावदा शहर उपाध्यक्ष अजहर खान तसेच सदस्य किशोर परदेशी, देवेंद्र चौधरी, इकबाल पिंजारी, जगदीश चौधरी, दिलीप सोनवणे, भूषण सोनवणे, सचिन सकळकळे, प्रशांत सरवदे उपस्थित होते.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |











Post a Comment