Khandesh Darpan 24x7

२४ जून रोजी सावदा श्री स्वामिनारायण मंदिराचा ११२ वा पाटोत्सव चे धामधुमीने आयोजन



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


दि. २४ जून २०२६ रोजी श्री स्वामिनारायण मंदिर सावदा चा ११२ वा पाटोत्सव चे धामधुमीने आयोजन करण्यात येणार आहे.


मागील वर्षाचे संग्रहित छायाचित्र


श्री स्वामिनारायण मंदिर सावदाची प्रतिस्थापना आजच्या ११२ वर्षापूर्वी जेष्ठ शुद्ध दशमी च्या दिवशी प.पू.ध.धू. श्रीपती प्रसादजी महाराज यांचे हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत मंदिरात अखंडितपणे पाटोत्सवाची परंपरा आहे.



त्याच शृंखलेतील यावर्षीचा हा ११२ वा पाटोत्सव आहे. मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांनी परमपूज्य शास्त्री स्वामी धर्मप्रसाददासजी व परमपूज्य शास्त्री स्वामी भक्तिप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाने या सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. याच दिवशी स्वामिनारायण भगवान यांचा स्वधामागमन दिवस सुद्धा असतो त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. 



संपूर्ण स्वामिनारायण संप्रदायात स्वामिनारायण भगवंतांच्या स्वधामागमन दिवशी श्री स्वामिनारायण मंदिर सावदा चा पाटोत्सव असणे ही एकमेवाद्वितीय घटना आहे. या दिवशी सकाळी भगवंतास अभिषेक केला जातो. 


जाहीरात


यामध्ये गंगा जलासकट सात नद्या व समुद्राच्या पाण्याचे जळ वापरून दूध, सहद, फळांचा रस, केसर, शर्करा इत्यादी सामग्रीचा वापर करून भगवंतास अभिषेक केला जातो. हे अभिषेकाचे जळ हरिभक्त भक्ती भावाने प्राशन करतात. तद्नंतर भगवंतास शृंगार केले जातात. 



मंदिराच्या कळसावरील ध्वजपताका या दिवशी नव्याने रोहण केले जातात. तद्नंतर भगवंतासमोर ५६ भोगांचा अन्नकुट महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाच्या आरतीसाठी सावदा शहराच्या पंचक्रोशीतील खेड्यापाड्याहून हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात व याच दिवशी उपस्थित दर्शनार्थी हरी भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. 



या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि २३ जून २०२६ रोजी श्री स्वामिनारायण मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर अशी जळयात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेद्वारे सूर्यकन्या तापी नदीचे पाणी विठ्ठल मंदिरापासून वाजत गाजत श्री स्वामिनारायण मंदिरात भगवंताच्या जलाभिषेकासाठी आणण्यात येते. 



पाटोत्सवाच्या दिवशी परिसरातील संत मंडळींना आमंत्रित केले जाते. व भव्य अशा सत्संग सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सत्संग सोहळ्यात उपस्थित संतांकडून हरिभक्तांना प्रबोधन पर प्रवचने केली जातात. यावर्षीच्या पाटोत्सवाचे यजमान पद सावदा वासीय जगन्नाथ प्रेमचंद व अशोक प्रेमचंद नेमाडे या दोन्ही भावांच्या परिवाराने स्वीकारलेले आहे. 



या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास, शास्त्री स्वामी धर्मकिशोरदास, शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदास, भंडारी स्वामी माधव प्रकाशदास, पुजारी स्वामी सत्यप्रकाशदास, पार्शद मानस भगत, वीरा भगत, शिवा भगत व मंदिराचे विश्वस्त मंडळ यांचे सहकार्य लाभते.



असे असतील धार्मिक कार्यक्रम : 


२३ जून २०२६ मंगळवार 

  • जळयात्रा संध्याकाळी ५ वा. श्री स्वामिनारायण मंदिर ते विठ्ठल मंदिर सावदा.

२४ जून २०२६ बुधवार 

  • मंगळा आरती : सकाळी ५:३० वा.
  • अभिषेक : सकाळी ७:०० वा.
  • ध्वजारोपण : सकाळी ८:३० वा.
  • सत्संग सभा : सकाळी ९:०० वा.
  • अन्नकुट आरती : सकाळी १०:३० वा.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   





व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post