प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे तथा विद्दमान नगराध्यक्षा रेणुका पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या "जिल्हा निमंत्रित सदस्य" पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे सावदा शहरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांनी ११ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली ही नवीन कार्यकारणी गठित केली. यात ही अनुसूचित जाती मोर्चाची जम्बो कार्यकारणी जाहीर केली. यात या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीत आणि विविध समित्यांमध्ये 'जिल्हा निमंत्रित सदस्य' (District Invitee member) हे पक्षाच्या जिल्हा पातळीवरील महत्त्वाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि पक्षाच्या धोरणांवर विचारविनिमय करण्यासाठी निमंत्रित केलेले ज्येष्ठ व महत्त्वाचे कार्यकर्ते किंवा नेते असतात.
या महत्त्वपूर्ण नियुक्तीनंतर नंदाबाई लोखंडे आणि रेणुका पाटील जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व अधिकृत बैठकांना उपस्थित राहू शकतात आणि पक्षाच्या धोरणांवर किंवा स्थानिक विषयांवर आपले मत मांडू शकतात. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि निवडणुका किंवा इतर महत्त्वाच्या विषयांवर जिल्हाध्यक्ष व इतर मुख्य पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम त्या करू शकतात.
भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शासकीय व पक्षीय कार्यक्रमांमध्ये त्यांना निमंत्रण सदस्य म्हणून उपस्थित राहावे लागणार आहे. जिल्ह्याभरातील विविध कार्यक्रमांमध्ये अनुसूचित जाती मोर्चाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि पक्षीय ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
नंदाबाई लोखंडे यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या विस्तारासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल नंदाबाई लोखंडे यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मंत्री रक्षाताई खडसे, महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जळगाव विधानपरिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजू भोळे (सुरेश दामू भोळे), रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमोल जावळे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांचे आभार मानले आहे.
पक्षाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मन:पूर्वक आभार मानते व मी अनुसूचित जाती आणि समाजाच्या विकासासाठी व पक्षाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मी प्रामाणिकपणे काम करेन. - नंदाबाई लोखंडे











Post a Comment