प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
समस्त भाविक भक्तगणांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमांगल लॉन कार्यालय, यावल रोड, फैजपूर ता. यावल या ठिकाणी दि. १६ ऑगस्ट २०२६ रोज रविवार या दिवशी श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज आणि श्री शंकर महाराज या दत्तविभुर्तींच्या चरित्रग्रंथाचे सामूहिक परायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी परायणामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या २१ अध्यायी ग्रंथाचे वाचन होणार आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम रूपरेषा :
सकाळी ५.३० ते ७.०० श्रीनाभिषेक
सकाळी ७.०० ते ७.३० प्रधान संकल्प
सकाळी ७.३० ते ९.३० ग्रंथ वाचन
सकाळी ९.३० ते १०.०० अल्पोपहार (विश्रांती)
सकाळी १०.०० ते १२.०० उर्वरित ग्रंथवाचन
दुपारी १२.०० ते १२.१५ श्रींचा पालखी सोहळा
दुपारी १२.१५ ते २.३० महामेवेच व आरती
दुपारी २.३० पासून पुढे महाप्रसाद
भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना व नियम :
- कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याने भाविकांनी सकाळी ७.०० वाजेपर्यंत कार्यक्रम स्थळी पोहोचणे आवश्यक आहे.
- येताना भाविकांनी 'श्री स्वामी चरित्र सारामृत' हा २१ अध्यायी ग्रंथ (पोथी), वासायला आसन, नारळ, व्यासपीठ इत्यादी साहित्य सोबत आणावे.
- परायणासाठी येणाऱ्या महिलांसाठी सकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत त्रीवेणी मंदीर, फैजपूर येथे ने आण करणाऱ्यांसाठी मोफत दिशा व्यवस्था करण्यात आली असून, परायणास काळे वस्त्र परिधान करून बसू नये.
- परायण स्थळावर ग्रंथाचे वाचन लाऊडस्पीकरच्या माध्यमातून होणार असून, भारतीय बैठकीसोबतच देवळ खुर्चीची देखील व्यवस्था आहे.
- कार्यक्रमादरम्यान सर्वांनी आपले मोबाईल सायलेट किंवा बंद ठेवावेत तसेच आप-आपसात व मोबाईलवर चर्चा टाळावी.
- पालखी खांद्यावर घेऊ इच्छिणाऱ्या पुरुषांसाठी धोतर किंवा सोवळे नेसणे बंधनकारक आहे.
- हा कार्यक्रम कोणत्याही आर्थिक प्रलोभनातून किंवा प्रसिद्धीसाठी नसून सर्वांचे कल्याण व्हावे हाच एकमेव हेतू आहे. त्यामुळे कोणतीही मौल्यवान दाग-दागिने, चजवरतू सोबत आणू नयेत, याची सर्व जबाबदारी स्वतःवर राहील.









Post a Comment