Khandesh Darpan 24x7

थोरगव्हाण ता. रावेर येथील विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था मर्या. थोरगव्हाण ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


थोरगव्हाण ता. रावेर येथील विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था मर्या. थोरगव्हाण या संस्थेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे चेअरमन मधुकर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरण संपन्न झाली. 


या सभेला संस्थेचे सचिव तथा सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला देशाचे शहीद जवान, संस्थेचेजुने सभासद व सहकार क्षेत्रातील मयतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत एकूण ११ विषयांवर चर्चा करून सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. प्रसंगी संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर मुरलीधर पाटील यांची महाराष्ट्र शासन दि. १२/०८/२०२५ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ६९ शासन निर्णय दि. १८/०३/२०१९ च्या अनुषंगाने जळगाव जिल्हा सहकारी देखरेख संघ गटसचिव म्हणून पदोन्नती झाली. या त्यांच्या नियुक्ती बद्दल संस्थेचे चेअरमन मधुकर कोल्हे तथा सभासद चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 


ज्ञानेश्वर पाटील सन २००६ पासून संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत झाले. त्यानंतर २०१४ पासून त्यांनी संस्था नियुक्त सचिव म्हणून जवळजवळ १३ वर्षे आपली सेवा बजावली. त्यानंतर आता दि. १६ जुलै, २०२६ पासून जिल्हा देखरेख संघ जळगाव अंतर्गत गटसचिव म्हणून पदोन्नती झाली. 


शेवटी आयत्या वेळीच्या विषयावर संस्थेचे सभासद शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी सुदगाव, रायपूर शिवारातील हतनूर पाटा शेजारील शेतामध्ये पावसाचे खूप प्रमाणात पाणी तुंबते, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या संदर्भात रावेरचे तहसीलदार तसेच पाटबंधारे खाते यांचेकडे शेतकऱ्यांच्या या समस्येसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे सुचविले. यावर चेअरमन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, त्वरित या संबंधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 

त्याचप्रमाणे संस्थेने सन २०२५-२६ या वर्षात ३१ मार्च २०२६ अखेर बँक कर्ज १००% वसुली केली त्यानिमित्त रावेर येथील तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय येथे संस्थेचे चेअरमन मधुकर कोल्हे व गटसचिव ज्ञानेश्वर पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत बँकेच्या संचालिका जनाबाई गोंडू महाजन आणि रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन गोंडू महाजन यांचे हस्ते करण्यात आला. सत्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे होते. गटसचिव ज्ञानेश्वर पाटील यांच्या अनुपस्थितीत संस्थेचे संचालक राजेंद्र पाटील यांनी हा सत्कार स्वीकारला.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

जाहीरात



सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



             सौजन्य: दै. लोकमत   व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post