Khandesh Darpan 24x7

भारतमाता वंदन कार्यक्रमात ‘किर्तीकाव्यसरिता’ चे प्रकाशन

सावदा येथील श्री यमुनेश्वर महादेव मंदिरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सावदा येथील श्री यमुनेश्वर महादेव मंदिरात पूर्णवाद युवा फोरम, पूर्ण कन्या प्रतिष्ठान व अभिजित ओवे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत माता वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कवयित्री डॉ. किर्ती लोखंडे यांच्या ‘किर्तीकाव्यसरिता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.



प्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे शिक्षक सचिन सकळकळे आणि कवयित्री डॉ. किर्ती लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सचिन सकळकळे यांनी विद्यार्थ्यांनी "केवळ शालेय जीवनात केवळ गुणांच्या मागे न लागता कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा", असे आवाहन केले.


डॉ. किर्ती लोखंडे यांनी "सप्तसुखांमध्ये आरोग्यसंपदेचे महत्त्व तसेच शरीरातील पंचतत्त्वांचे संतुलन कसे राखावे", याविषयी कवितेच्या माध्यमातून प्रभावी मांडणी केली.


प्रसंगी 'किर्तीकाव्यसरिता’ या डॉ. किर्ती लोखंडे लिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन सचिन सकळकळे यांच्या हस्ते  करण्यात आले. विद्यार्थ्यांना, शाळांना तसेच वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त असून, एकाच वेळी पाचपेक्षा अधिक पुस्तके खरेदी करणाऱ्यांना अर्ध्या किमतीत पुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा खारे यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली असली, तरी आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो आहोत का? याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याची मूल्ये जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले.


कार्यक्रमास शीतल अकोले, टीना खारे, संजय खारे यांच्यासह पूर्णवादी परिवारातील सदस्य, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भारतमाता वंदन कार्यक्रमाला विशेष रंगत आली.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

जाहीरात



सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



             सौजन्य: दै. लोकमत   व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post