Khandesh Darpan 24x7

जलवाहिनी फुटल्याने सावदा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प ; पाण्याचा साठा काटकसरीने वापरण्याचे पालिकेचे आवाहन



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने सावदा शहरावर दोन दिवस पाणीसंकट ओढावले आहे. मांगलवाडी येथून शहराकडे येणाऱ्या मुख्य 'रॉ वॉटर' (Raw Water) जलवाहिनीला येथील सरकारी गुरांच्या दवाखान्या परिसरात अचानक मोठी गळती झाली यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे लक्षात येताच पालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.



मुख्य जलवाहिनीच्या या दुरुस्ती कामामुळे पुढील अंदाजे दोन दिवस संपूर्ण सावदा शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. भरउन्हात किंवा दैनंदिन कामांत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काम यशस्वीरीत्या पूर्ण होताच शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत केला जाईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.


पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत नागरिकांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातील उपलब्ध पाण्याचा साठा अत्यंत काटकसरीने व संयमाने वापरावा. तसेच, या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनात्मक प्रकटन सावदा पालिकेतर्फे करण्यात आले आहे.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

जाहीरात



सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



             सौजन्य: दै. लोकमत   व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post