Khandesh Darpan 24x7

विज्ञानाशिवाय मानवाने प्रगती साधणे अशक्य : प्रा. चौधरी : देशमुख विद्यालयात विज्ञान मेळाव्याचे आयोजन


प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण ता. रावेर येथे शालेय पातळीवरील अपूर्व विज्ञान मेळावा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले. विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन भारताचे मिसाइल मॅन भूतपूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. 



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक सेवानिवृत्त प्रा. एस.एच. चौधरी तर प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्रा.डॉ. दिलीप भारंबे होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, संचालक नंदकुमार चौधरी, संचालक चंद्रकांत सुराजी पाटील तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष मनोज वाघ, सहसचिव सुरेश ठाकरे, शिक्षक पालक संघाचे सदस्य गणेश ठाकरे, विजय चौधरी, शिंदे दादा या मान्यवरांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक के.पी. चौधरी यांनी केले तर विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.के. पाटील यांनी मनोगतातून ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान या त्रयींचे महत्त्व विशद करून अपूर्व विज्ञान मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक भारंबे यांनी छोटे छोटे प्रयोगातून विज्ञानाचे प्रात्यक्षिक करून दाखवली व मानवी जीवनात विज्ञान किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते हे विषद केले. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी असा सल्ला दिला व विज्ञानाशिवाय मानवाने प्रगती साधणे अशक्य आहे असे मत व्यक्त केले. प्रसंगी इन्स्पायर अवार्ड साठी निवड झालेल्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी धनश्री पाटील हिचा पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विज्ञान शिक्षक पी.सी. कचरे यांनी मानले. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षक के.पी. चौधरी, पी.सी. कचरे, एन. बी. चौधरी, एस.पी. पाटील, एन.ए. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठीचे फलक लेखन कलाशिक्षक एस. बी. सपकाळे यांनी केले. 


विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे, जे.ऐ. चौधरी यांनी सहकार्य केले तर विद्यार्थ्यांना शिस्तीत सांभाळण्यासाठी एम.के. पाटील, के. एम. पाटील, जयश्री पी.चौधरी, नयना डी. पाटील यांनी सहकार्य केले अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना विज्ञान अपूर्व मेळावा ही संकल्पना मूर्त स्वरूपात पाहायला मिळाली व प्रयोगाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून समजून घेता आले यासाठी सर्व शिक्षकेतर कर्मचारी संजय झोपे, अक्षय तायडे यांनी देखील सहकार्य केले.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

जाहीरात



सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



             सौजन्य: दै. लोकमत   व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post