Khandesh Darpan 24x7

नैसर्गिक नाला बुजवून ले-आऊट मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार ; रहिवाशांकडून कारवाईची मागणी



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



सावदा ते फैजपूर राज्यमार्गावरील नैसर्गिक जलप्रवाह (नाला) भू-माफियांनी नियमबाह्यरित्या बुजवून त्या ठिकाणी ले-आऊट मंजूर करून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे पावसाळ्यात येथील रहिवासी व शाळकरी विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांनी आणि माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी प्रशासनाकडे धाव घेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


जाहीरात



सविस्तर वृत्त असे की, सावदा शहरातील फैजपुर रोड हॉटेल मनाली लगत महसूल विभागाच्या नोंद वर असलेला एक मोठा नैसर्गिक नाला आहे. हा नाला ११ कि.मी. अंतरावरून येत असून पावसाळ्यात तो पूर्ण क्षमतेने वाहतो. मात्र, काही भू-माफियांनी संगनमत करून कागदपत्रात फेरफार करत हा नाला 'नाली' मध्ये रूपांतरित केला आणि गट नं. १३५ मध्ये नियम धाब्यावर बसवून ले-आऊट मंजूर करून घेतल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.



अर्जात नमूद केल्यानुसार, प्रत्यक्ष जागेवर २७ ते २८ फूट रुंदीचा हा नैसर्गिक नाला होता. मात्र, तो नामशेष करून त्या जागी केवळ २ ते ३ फुटांचे सिमेंट कांक्रीटची गटार बांधण्यात आली आहे. यासाठी २०१६ सालची जुनी मोजणी शीट वापरून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.



पावसाळ्यात हा नाला तुंबल्यामुळे पाणी लगतच्या रहिवासी वसाहतींत आणि राज्यमहामार्गावर शिरते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून पाणी तुंबत असल्याचे मान्य केले होते, तरीही भू-माफियांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.



नैसर्गिक जलप्रवाह बुजविणे हा गंभीर गुन्हा असून, भारतीय नागरिक संहिता १५२ अन्वये संबंधितांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी केली आहे. तसेच, सदर ले-आऊटची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या जीवित व आर्थिक नुकसानीस प्रशासन व संबंधित मालक जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे. 


या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, सहसंचालक (नगररचना), तहसीलदार आणि स्थानिक नगरपरिषदेला देण्यात आल्या आहेत.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



               


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 






Post a Comment

أحدث أقدم