स्वाभिमानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सचिव संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय समोर १ जून पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी वादळामुळे आंदोलन कर्त्यांच्या अंगावर मंडप कोसळला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील संस्था नियुक्त सचिवांना जिल्हा देखरेख संघात समाविष्ट करणे आज पर्यंत झालेले सेवाग्राह्य धरून कामगार कायद्यान्वये वेतन श्रेणी लागू व्हावी प्रलंबित दीड टक्के अनुदान संस्थांना प्राप्त करावे या मागण्यासाठी अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे दरम्यान आंदोलन करते संघटनेचे अध्यक्ष गणेश अरविंद रेवगडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर सहकार व पणन मंत्रालयाने तातडीने दखल घेत बैठक घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेऊन अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे निर्देश कक्ष अधिकारी तेजल पारडे यांना दिले असून सुद्धा जळगाव जिल्हा देखरेख संघाचे कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष शासनाचे परिपत्रक वजा आदेशाची अवहेलना करत असून सदर आदेशावर अंमलबजावणी करत नाहीयेत.
आदेश असा आहे "जे संस्था नियुक्त सचिव आहेत त्यांना देखरेख संघाच्या सचिव पदांमध्ये समाविष्ट करण्यात यावे. खाजगी सचिवांना जिल्हा त्रीसमितीने तसे नियुक्ती पत्र दिलेले आहे याच नियुक्ती पत्राच्या आधारावर शासनाने जो जीआर काढलेला आहे की, या खाजगी सचिवांना जिल्हा देखरेख संघात सामावून घेण्यात यावे" याच आदेशाचे स्मरणपत्र सुद्धा शासनाने देखरेख संघाला यापूर्वी दिलेले आहे असे असून सुद्धा वरील संस्थेचे पदाधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत तीन दिवसापासून आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग करून सुद्धा वरील संघाचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी फिरकून सुद्धा पाहिलेले नाही.
आंदोलकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, सचिवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून समायोजन प्रक्रियेला गती द्या, शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि सचिवांना न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात येत आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र झाले असून "न्याय द्यायचा नसेल तर फासी द्या, आम्ही तयारी केली आहे" असा आंदोलकांनी शासनाला इशारा दिला आहे. तथापि जिल्हा प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे आता सचिव बांधवांचे लक्ष लागले आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |












إرسال تعليق