प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
अक्कलकोट येथील 'श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट' च्या वतीने राज्यभर राबविल्या जाणाऱ्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून, सावदा शहरातील रावसाहेब प्रेमचंद नगर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे जंगी आगमन होणार आहे. ज्या भक्तांना प्रत्यक्ष अक्कलकोटला जाणे शक्य होत नाही, अशा भक्तांसाठी त्यांच्याच शहरात स्वामींच्या कृपेचा लाभ मिळावा, हा या पालखी आगमनाचा मुख्य उद्देश आहे.
येत्या ८ जून २०२६, सोमवार रोजी सकाळी ११ वाजता स्वामींच्या पालखीचे आणि पादुकांचे आगमन होणार आहे. या सोहळ्यासाठी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र विभागाचे प्रमुख संतोष महाराज विशेष उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ ते दुपार ४ या वेळेत हा दर्शन सोहळा पार पडणार आहे. सुमारे ३० वर्षांपासून स्वामी समर्थांच्या निगुर्ण पादुकांची पालखी दरवर्षी सावदा शहरात येत असून, हजारो भक्त या दर्शनाचा लाभ घेत असतात.
अनेक भाविकांनी या पवित्र दर्शनातून मानसिक समाधान, आध्यात्मिक ऊर्जा आणि स्वामींची कृपादृष्टी लाभल्याचा अनुभव व्यक्त केला आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार, स्वामींच्या पादुकांवर मस्तक टेकवून आपल्या अडचणी, संकटे आणि मनोकामना व्यक्त केल्यास त्यांचे निराकरण होते आणि इच्छापूर्तीचा आशीर्वाद लाभतो.
विशेष म्हणजे, तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासानिमित्त स्वामींच्या पादुकांचे आपल्या शहरात आगमन होत असल्याने, हा सोहळा सावदा शहर वासियांसाठी अत्यंत आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे. धार्मिक परंपरेनुसार अधिक महिन्यात केलेले पूजन, दर्शन, सेवा आणि सत्कर्म यांना विशेष पुण्यप्राप्तीचे महत्त्व असते. त्यामुळे या कालावधीत स्वामींच्या निर्गुण पादुकांचे दर्शन होणे हे भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि भाग्याचे मानले जाते.
या दुर्मिळ दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सर्व सेवेकरी आणि स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रा तर्फे करण्यात आले आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |










إرسال تعليق