Khandesh Darpan 24x7

सावदा शहरात हॉटेल, किराणा दुकाने व उपहारगृहांच्या तपासणीची नागरिकांची मागणी



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावदा शहरासह परिसरातील हॉटेल, किराणा दुकाने, रेस्टॉरंट, उपहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विविध आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव जाणवत असल्याने, अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून जोर धरत आहे.



जाहीरात



अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरातील हॉटेल आणि किराणा दुकानांसाठी स्वच्छता व अन्न सुरक्षेबाबत नवीन नियमावली लागू केली आहे. मात्र, सावदा शहरात अनेक खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. अस्वच्छ वातावरणात तयार केलेले किंवा विक्री केलेले खाद्यपदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.



स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाने विशेष मोहीम राबवून खाद्यपदार्थ तयार करण्याची जागा, साठवणूक व्यवस्था आणि ग्राहकांना पदार्थ देण्याची पद्धत यांची तपासणी करणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि या तपासणी मोहिमेमुळे खाद्यपदार्थ विक्री व्यवस्थेत सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   





व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post