Khandesh Darpan 24x7

सावदा पोलीस स्टेशनच्या प्रभारीपदी सपोनी गणेश फड ; विशाल पाटील यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावदा पोलीस स्टेशनमध्ये प्रशासकीय बदल करण्यात आला असून सावद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची जळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सपोनी गणेश पांडुरंग फड यांची सावदा पोलीस स्टेशनच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.








जाहीरात



दि. २५ जून २०२६ रोजी या बदल्यांचे अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले असून तत्काळ या बदल्यांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सावदा पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. सपोनी विशाल पाटील यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले होते. तसेच अनेक सामाजिक, जनजागृती मोहिमा, गुन्हे प्रतिबंधक उपक्रम तसेच स्थानिक पातळीवरील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आले होते. त्यांच्या कार्यशैलीचे स्थानिक पातळीवर कौतुकही करण्यात आले.




दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेत कामाचा अनुभव असलेले सपोनी गणेश फड यांनी सावदा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला असून आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाचा त्यांना असलेला अनुभव लक्षात घेता, सावदा परिसरातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बदल्यांमुळे सावदा पोलीस विभागात प्रशासकीय पातळीवर महत्त्वपूर्ण फेरबदल झाले असून नवीन प्रभारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या बदल्यांमुळे सावदा पोलीस स्टेशनच्या कामकाजात नव्या गतीची अपेक्षा व्यक्त केली जात असून प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी स्थानिक पातळीवर चर्चा आहे.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   





व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post