प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात एमकेसीएल च्या एमएस-सीआयटी या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रमाला देशपातळीवरील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. डिजिटल साक्षरता या श्रेणीत मिळालेला हा सन्मान एमकेसीएल च्या गेल्या २५ वर्षांतील डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन आणि नागरिक सक्षमीकरणातील सातत्यपूर्ण योगदानाची राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे.
स्कॉच पुरस्कार हा भारतातील शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, कौशल्यवृद्धी आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना दिला जाणारा एक मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. महाराष्ट्रातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडण्याचे कार्य एमएस-सीआयटी ने गेली अनेक वर्षे प्रभावीपणे केले आहे.
या सन्मानाबद्दल एमकेसीएल चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार एमकेसीएल परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा सन्मान कोट्यवधी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा, तसेच हजारो केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, प्रशिक्षक, नेटवर्क पार्टनर्स, एमएसबीटीई, एमकेसीएल मधील सर्व सहकारी, संस्थापक मार्गदर्शक, तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेल्या विश्वासार्ह पाठबळामुळे आहे. या सर्व घटकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एमएस-सीआयटी ने महाराष्ट्रात डिजिटल परिवर्तनाची व्यापक चळवळ उभारली आहे.”
एमकेसीएल च्या महाराष्ट्रभर पसरलेल्या ५००० हून अधिक अधिकृत शिक्षण केंद्रांमुळे MS-CIT ने ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आणि परवडणारे डिजिटल शिक्षण पोहोचवले आहे. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित युगाच्या गरजा लक्षात घेऊन एमएस-सीआयटी अभ्यासक्रम नव्याने अधिक सक्षम स्वरूपात सादर करण्यात आला असून त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence (AI), माहिती तंत्रज्ञान सुरक्षा (Cyber Security), डेटा साक्षरता (Data Literacy), क्लाऊड संगणन (Cloud Computing) आणि आधुनिक डिजिटल साधनांचा समावेश आहे.
या सन्मानामुळे महाराष्ट्राला अधिक सक्षम, डिजिटलदृष्ट्या साक्षर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-सज्ज (AI-Ready) बनविण्याचे एमएस-सीआयटी चे हे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याची प्रेरणा देणारी आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |











Post a Comment