प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
जमात-ए-इस्लामी हिंद, फैजपूर यांच्या वतीने शहराध्यक्ष अब्दुल रऊफ जनाब यांच्या अध्यक्षतेखाली एम.पी.जे. (Movement for Peace and Justice), एस. आय. ओ. (Students Islamic Organisation) आणि युथ मूव्हमेंट Youth Movement Maharashtra Faizpur, यांच्या संयुक्त विद्यमाने BLO–SIR जनजागृती अभियान व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीत SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. मतदार नोंदणी, आवश्यक कागदपत्रे, BLO यांची जबाबदारी, अर्ज (फॉर्म) अचूकपणे कसा भरावा, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी तसेच संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करून प्रत्यक्ष फॉर्म भरण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी एम.पी.जे. फैजपूर शहराध्यक्ष रहीमुद्दीन, उपाध्यक्ष बी. डी. महाले, जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद, युथ मूव्हमेंट अध्यक्ष शेख मोईन, एस.आय.ओ. अध्यक्ष शेख मुजम्मिल यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, BLO, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बैठकीत प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीसंदर्भातील आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. उपस्थितांनी जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंतही ही माहिती पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |











Post a Comment