Khandesh Darpan 24x7

कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत समाज भूषण पुरस्काराने सन्मानित



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पर्यावरण इत्यादी उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करून मानवसेवा, समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि निसर्गसेवेप्रती समर्पणासाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील इंग्रजी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र रघुनाथ राजपूत यांना राजपूत समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. 


जाहीरात



सदर पुरस्कार श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना संस्थापक अध्यक्ष, स्व. सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा ॲड. शीला सुखदेसवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कट्यार यांच्या हस्ते व प. पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच विलास पाटील, दामोदर राजपूत, डॉ. विश्वजित सिसोदिया, विठ्ठलसिंग मोरे यांच्या सोबत राष्ट्रीय व महाराष्ट्र टीम यांच्या उपस्थितीत आयोजक  प्रवीणसिंह पाटील प्रदेश कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. 



याआधीही कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांना सर्वोत्कृष्ट एन. सी. सी. अधिकारी पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हास्तरीय तालुका करिअर कट्टा समन्वयक पुरस्कार, मिर्झा गालिब पुरस्कार, सकाळ गौरवगाथा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



सदर पुरस्काराने समाजाप्रती समर्पणाची पावती मिळाली असून भविष्यात समाजाची अधिकाधिक सेवा करण्याची प्रेरणा अधिक प्रज्वलित होईल अशी भावना कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी व्यक्त केली. सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.






या बातमीचे प्रायोजक आहे. 

या ठिकाणी आपल्या व्यवसायाची जाहिरात पहा.



सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

أحدث أقدم