Khandesh Darpan 24x7

गणेशोत्सवापूर्वी सावदा ते हतनूर धरण रस्ता दुरुस्ती आणि साफसफाई करा ! : नगरसेविका सिमरन वानखेडे यांची आमदार व मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी सावदा ते हतनूर धरण रस्ता दुरुस्ती आणि साफसफाई करा ! नगरसेविका सिमरन वानखेडे यांची आमदार नंदकिशोर महाजन व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




सावद्यासह संपूर्ण परिसरात आगामी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, पावसाळ्यामुळे शहरातील रस्ते तसेच विसर्जन मार्गांची दुरवस्था झाल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी सावदा ते हतनूर धरण विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवून तातडीने दुरुस्ती करावी, तसेच शहरातील आगमन व विसर्जन मार्गांची डागडुजी, साफसफाई आणि दिवाबत्तीची सोय करावी, अशी मागणी सावदा नगरपरिषदेच्या नगरसेविका सिमरन राजेश वानखेडे यांनी केली आहे.


या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे विधान परिषद सदस्य आ. नंदकिशोर महाजन आणि सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना स्वतंत्र निवेदने दिली आहेत. 


आ. नंदकिशोर महाजन यांच्याकडे हतनूर धरण रस्त्याची दुरुस्ती : सावद्याहून हतनूर धरण येथे मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र, या मार्गावर मोठे खड्डे पडले असून रस्ता अत्यंत खराब झाला आहे. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, 


काटेरी झुडपे व झाडे हटवणे : धरण क्षेत्राजवळ विसर्जनासाठी खाली उतरताना रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व अनावश्यक झाडे वाढली आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून भाविकांना अडथळा ठरत आहे. ही झुडपे काढून मार्ग स्वच्छ, मोकळा व सुरक्षित करावा. या मुख्य मागण्या केल्या आहेत.


मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगरसेविका सिमरन वानखेडे यांनी नमूद केले की, "गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला असून घरगुती व सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झाली आहे. अशा वेळी पालिकेने आपली जबाबदारी ओळखून कामे करणे अपेक्षित आहे. गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मार्गांवर भाविक, महिला व पुरुषांना त्रास होऊ नये, मिरवणुका न खोळंबता उत्सव सुरक्षित पार पडावा, यासाठी रस्ते दुरुस्ती, दैनंदिन स्वच्छता आणि दिवाबत्तीची कामे तात्काळ हाती घेऊन उत्सवपूर्व पूर्ण करावीत."


तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या व भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित विभागांना तातडीने सूचना देऊन रस्त्यांची दुरुस्ती व साफसफाईचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

जाहीरात



सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



             सौजन्य: दै. लोकमत   व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 






Post a Comment

Previous Post Next Post