Khandesh Darpan 24x7

सावद्यात देशभक्तीचा जल्लोष : नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

सावद्यात देशभक्तीचा जल्लोष : नगराध्यक्षा  रेणुका पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण, तर ११० फूट उंच राष्ट्रध्वजाचेही आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत अनावरण




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



सावदा नगरपालिकेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. नगरपालिकेच्या प्रांगणात लोकनियुक्त नगराध्यक्ष रेणुका पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले. ध्वजारोहणानंतर नगराध्यक्ष पाटील यांनी शहीद स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणशिला  फलकाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन केले.


या प्रसंगी उपस्थित जनसमुदायाने 'वंदे मातरम', राष्ट्रगीत आणि 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचे उत्स्फूर्त गायन केले. उपस्थितांच्या देशभक्तीपर घोषणांनी सावदा नगरपालिकेचा परिसर पूर्णपणे दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी, नगरपालिका कर्मचारी व नागरिकांनी 'नशामुक्त भारत' अभियानाची गांभीर्याने शपथ घेतली.



यानंतर सकाळी दहा वाजता येथील आंबेडकर पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या हस्ते ११० फूट उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन ध्वजास मानवंदना दिली.


त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांनी अब्दुल हमीद शहीद स्मारकास भेट देऊन पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण केला व शूर वीरांना मानवंदना वाहिली. या प्रसंगी महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


त्याच प्रमाणे येथील ग्रामीण रुग्णालय, सावदा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश प्रभाकर राणे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास डॉ. सचिन पाटील, डॉ. रिद्धी मनोज पाटील, दिपक वसंत कोष्टी, दिगंबर परदेशी यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



दुय्यम निबंधक कार्यालय, सावदा येथे दुय्यम निबंधक स्वाती पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी शिपाई एन. ए. खान, ललिता चौधरी, सचिन भंगाळे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


त्याचप्रमाणे डायमंड स्कूल, सावदा येथे ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माऊली हॉस्पिटल (रावेर) चे डॉ. संदीप पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. या प्रसंगी संस्थेचे संचालक अब्दुल राजिक (रज्जौ सेठ), अब्दुल तफज्जुल (तफ्फो सेठ), हाजी हारून सेठ फाऊंडेशनचे अध्यक्ष नाजिम शेख, CEO सायमा मॅडम, सुपरवायझर फरहत जहां शेख, अलमीरा मॅडम, प्रिन्सिपल अशपाक पठाण सर, कविता मॅडम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर उपक्रमांत सहभाग नोंदवत स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले.


एकंदरीत, सावदा शहरातील विविध संस्था व कार्यालयांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश देत स्वातंत्र्यदिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

जाहीरात



सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



             सौजन्य: दै. लोकमत   व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

أحدث أقدم