प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
डायमंड स्कूल, सावदा येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात माऊली हॉस्पिटल, रावेरचे डॉ. संदीप पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि देशभक्तीची भावना दिसून आली.
कार्यक्रमास संस्था संचालक अब्दुल राजिक (रज्जौ सेठ), अब्दुल तफज्जुल (तफ्फो सेठ), हाजी हारून सेठ फाऊंडेशनचे अध्यक्ष नाजिम शेख, CEO सायमा मॅडम, सुपरवायझर फरहत जहां शेख, हारून सेठ, सुपरवायझर अलमीरा मॅडम, प्रिन्सिपल अशपाक पठाण सर, कविता मॅडम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर उपक्रमांमध्ये सहभाग घेत स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.










إرسال تعليق